मराठी
साहित्याच्या इतिहासात मोठ योगदान असलेल्या, साहित्य मंडळाची मोठी घटकसंस्था
असलेल्या, मराठी साहित्य परिषद ही साहित्य संस्था असलेल्या आणि प्रतिष्टीत
प्रकाशने व नियतकालिके असलेल्या औरंगाबाद शहरात नुकतच लिहित्या शिक्षकांचे
दोनदिवसीय साहित्य संमेलन पार पडले यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान,औरंगाबाद व शिक्षक
विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी उद्घाटनाने करण्यात
आली “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, वाचाल तर वाचाल , साक्षर जनता भूषण भारता हे
साक्षरतेचे महत्व पटवून देणारे फलक ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांच्या हातात होते
लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषा केली त्यात शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले ,
सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांचा समावेश होता या
सगळ्याच लहानग्यांची मिरवणूक बैलगाडीवरून काढण्यात आली होती .
संमेलनाचे अध्यक्षीय बालाजी मदन इंगळे
म्हणाले, ” विनाअनूदानित शाळेतील काही शिक्षक मुख्यमंत्र्यांना भेटायला येतात
तेव्हा त्यांच्यावर लाठीमार होतो, मंत्रालयात एक शेतकरी मंत्र्यांच्या भेटीला जातो
तर त्याला लाथाबुक्या खाऊन बाहेर याव लागत, स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणाऱ्या
श्रीहरी अणे यांच्या गाडीवर दगडफेक केली जाते हे सगळे होत असतांना सर्वसामाण्यांचा
आवाज दाबल्या जात असतांना लेखक, साहित्तीकांनी पुरस्कार वापसी का करू नये ? असा
सवाल देखील अध्यक्षांनी केला.
मराठवाड्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
आसाराम लोमटे , प्रा वीरा राठोड आणि प्रा रवी कोरडे यांचा या प्रसंगात विशेष
सत्कार करण्यात आला.
डॉ कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ
पुरस्कार २०१६ चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यंदाचा हा पुरस्कार शारदा
बर्वे यांना अध्यापन,अक्षमता आणि मुले , डॉ राजा दांडेकर यांना अशी घडली माणसे ,डॉ
श्रुती पानसे यांना बहुरंगी बुद्धिमत्ता या साहित्यकृतीसाठी पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
संमेलनात शिक्षकांच्या साहित्त्याचे देखील
प्रकाशन करण्यात आले.....गिरीश जोशी यांच्या “काव्य कस्तुरी” हा कविता संग्रह
प्रकाशित झाला, सुप्रसिद्ध बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड याचं “ मला उंच ऊडूदे “ हे
नाट्य छटेवरील कविता संग्रह प्रकाशित झाला, डॉ काझी निगाहत नासेर यांचा “ समकालीन
नाटकोमे आधुनिकता का बोध “ या पुस्तकाचे प्रकाशन झाले,दीपक राघुविरसिह ठाकूर
यांच्या “ लप्पा छप्पा हसणाऱ्या गप्पा “ या काव्यसंग्रहाच प्रकाशन झाल, डॉ प्रज्ञा
देशपांडे यांच्या साद या काव्यसंग्रहाच प्रकाशन झाल , विश्वनाथ ससे यांच्या “ मी
मनस्वी “ ह्या चारोळीसंग्रहाच प्रकाशन झाल.
लिहित्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकाचे
देखील प्रकाशन यावेळी झाले . जिल्हा परिषद केंद्रीय प्रार्थमिक शाळा, भुसणी ता.
उमरगा येथे कार्यरत असलेले बाळासाहेब वाघमारे ह्या शिक्षकाने विद्यार्थ्याना लिहित
केल आणि त्याचा परिपाक म्हणून एक विशेषांक तयार झाला “ शब्दांकूर “ या विशेषांकाचे
विद्यार्थ्यांनीच संपादन केलेले असून त्यात कविता गोष्टी व माहिती विद्यार्थ्यांनी
लिहिली आहे या विशेषांकाचे प्रकाशन देखील संमेलनात करण्यात आले .
आसाराम लोमटे यांनी आपले मनोगत माडतांना म्हणले
कि “ शिक्षक हा समाजातला अत्यंत जबाबदार दिशादर्शी असा घटक आहे . या समाजातील
मुल्य व्यवस्ता टिकवण्या मध्ये शिक्षकांच्ये योगदान आहे हे अतिशय असाधारण अस आहे
हा अक्षरांचा सोहळा आजच संभ्रमात असलेल्या युगाला दिशा देईल अस मी समजतो लेखकाने
केवळ मनोरंजन म्हणून लिहू नये विचारी लिहावे लेखन अस करा की वाचणारा बेचेन झाला
पाहिजे आपण समाजात अनेक शिक्षक शिक्षिका बघतो ते विध्यार्थ्याना हवी तेव्हडी मदत
करतात पण याही पुढे जाऊन एका शिक्षकाने स्वखर्चाने शेतमजुरांच्या मुलांना
विमानप्रवास घडवला असे असामाण्य कार्य केले आहे जाफराबादचे मुख्यध्यापक एस.एम
बुरकुल यांनी त्यांचा सत्कार संमेलनात करताना टाळ्यांचा एकच जल्लोष सभागृहात झाला
होता .
राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष
बाबा भांड म्हणाले की “ लिहिण्यासाठी आज अनुकूल अशी स्तिती नाही असे म्हंटले जाते
अश्या काही प्रमाणात घटनाही घडल्या आहे मात्र लोकशाहीत लिखाण आणि विचार स्वतंत्र
कुणीही हिराऊन घेऊ शकत नाही अस म्हाणाले. संस्कारशील लेखन करणारऱ्या शिक्षकांची आज
गरज असून शिक्षकांमुळेच मुलांवर वाचान लेखनाचे संस्कार झाल्याचे ते म्हणाले.
दुपारच्या सत्रात “ माझ्या लेखन प्रेरणा “ या मथळ्या
खाली तीन साहित्तीकांची मुलाखत घेण्यात आली यात डॉ संजीवनी तडेगावकर,रमेश इंगळे
,कृष्णात खोत हे होते तर केशव खटिग व संदीप जगदाळे यांनी मुलाखात घेतली....
या बायकोला कितीदा समजून सांगायचे
की मी मास्तर म्हणून मला ही दिली
चला मामाची म्हणून मिही तिला केली
अश्या एकाहून अधिक सरस कवितानी कविसंमेलन रंगले
अशोक कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले अध्यक्षस्तानी “ मनोगत “ या
कवितेतून मधल्या सुट्टित पळून जाणाऱ्या मुलांचे भावविश्व सादर केले , अरुण पवार
यांनी “वाटणी” कवितेतून उतारवयात आईबापाच्या हालअपेष्टाचे वर्णन केले तर सुनंदा
कांबळे यांनी “ आंधळ प्रेम “ मधून प्रेमासाठी वाटेल ते करणारऱ्या अन विवाहित
पुरुषावर प्रेम करणारऱ्या स्त्रीच्या मनातील भाव मांडले
दुसर्या दिवशी साहित्य संमेलनाचा समारोप झाल या
प्रसंगी प्रा पठारे म्हणाले “ साहित्य आणि शिक्षण हे संस्कार आहे तो परिवर्तनासाठी
आणि जबाबदारी म्हणून गांभीर्याने घेता आला पाहिजे कथा ,कविता आणि कादंबरी लिहिणे
म्हणजे लेखन हा असलेला गैरसमज दूर व्हायला हवा . मुळात शिक्षकाचे पहिले काम
ज्ञान-विज्ञानात परीपूर्ण असणे हे आहे ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्यात परीपूर्ण
असलेच पाहिजे मराठी भाषेविषयी बिलातांना प्रा पठारे म्हणाले ,”मराठी भाषा समृद्ध
होण्यासाठी भाषेप्रती आदर असावा लागतो . भाषा म्हणजे केवळ शब्दसाठा नाही .आधुनिक
काळात ज्ञान –विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतून मिळणे महत्वाचे आहे .
लिहित्या शिक्षकांचे साहित्य संमेलन सरते शेवटी
संपले पण काही प्रश्न उपस्तीत करून गेले......पदरमोड करून विद्यार्थ्याना
विमानप्रवास घडवणारे बुरकुल सरांचे कार्य असोत वा विद्यार्थ्याना लिहित करणारे
वाघमारे सर असो.......गुरुजनांनी फक्त पाठ्यक्रम शिकवावा आणि आपली नौकरी करावी
याही पुढे जाऊन ह्या शिक्षकांनी जे कार्य केले आहे ते कौतुकास्पद आहे. साहित्य
संमेलनातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे “ लिहित्या शिक्षकाने
विद्यार्थ्याना लिहित केल्याची “