"ते विद्यार्थी शाळा बहिस्त नाही . आपण समाज म्हणून त्यांना त्यांच्या शिक्षण या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवतो . आणि पालक म्हणून हक्कांने बालवयात ढोर मेहनत करून घेतो ."माझ्या पहिल्या प्रश्नावर उत्तर देणाऱ्या वैजयंता मिसाळ क्षणिक भावुक झाल्या . प्रतिभाताई पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका २२ शाळाबहाय विद्यार्थ्यांचे स्व :खर्चाने शिक्षण करतात . एव्हडच नव्हे तर अशिक्षित महिलांनाही सक्षम व शिक्षित बनवतात . त्यांनी अनेक अंगठे बहाद्दर गृहिणींना सुशिक्षित केले . व्यसनी पालकांना निर्व्यसनी केले . पैश्या अभावी मुलींचे लग्न कार्य थांबवणाऱ्या गरीब गृहिणींना एकत्र घेऊन बचतगट उभारला अश्या अष्टपैलु व्यक्तिमत्वाच्या वैजयंताताई आजही पहाटे ४ ला उठतात
बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैजयंता ताईंवर भगवान बाबांचे संस्कार झाले बलवयातच लग्न झाले सासरी शेतमजुरी हा हुद्दा असल्याने प्रचंड ढोर-मेहनत करावी लागते . शेतमजूरी करत असताना मनात विचार आला आपले चुलत मावस भावंडं उच्चं पदांवर आहे उच्चं शिक्षित आहे मग आपण का नाही ? त्या नंतर ताईंनी ४ व ७ वि बहिस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षा दिली त्यात त्या पास झाल्या त्या नंतर रात्र शाळेत जाऊन अभ्यास करणाऱ्या ताईंनी १७ नंबर चा फ़ॉर्म भरून १० वि दुसर्या प्रयत्नात पार केली ताईंना येव्हड़यावरच थांबायचे नव्हते त्या औरंगाबाद ला येताना वडिलांनी दिलेली घोंगडी ,आंधळ्या आत्याने दिलेला पितळी स्टो आणि परात घेऊन आल्या . डि एड ला प्रवेश घेतला त्या काळात पैश्याचा अभाव असल्याने ताई अनेक ठिकाणी पाई जायच्या त्यांनी कधीही रिक्षा केली नाही त्या नेहमी पाई जायच्या ताई डि एड उत्तीर्ण झाल्या
आता प्रश्न होता शाळा उभी करण्याचा एन ११ मढील यादवनगर मध्ये एका भाड्याच्या खोलीत ७ मुलासह शाळा सुरु केली पैश्याच्या अभावाने ताई १० रुपये महिन्याने शिकवणी घेत असत ताई सांगतात "मध्यम वर्गीय कुटुंबातून लहान मुले यायची तेव्हा मी बादली भरून पाणी आणायची पावडरचा डब्बा घ्यायची आणि विद्यार्थ्याना नीटनेटके करून बसवायची मी साधारण महिना भर हा प्रयोग केला त्या नंतर पालकच विद्यार्थ्याना नीटनेटके पाठवू लागले . तो प्रसंग अविस्मरणिय होता ." एकाच खोलीत रहायच्या त्याच खोलीत शाळा घ्यायच्या आणि तिथेच अभ्यासिका घेणाऱ्या ताईणा त्रास देणारेही कमी नव्हते . रात्री भाडोत्री गुंड पाठवून त्रास देणे . पालकांना भडकवणे,असे अनेक कारनामे करणाऱ्या शत्रूकडे ढुंकूनही न बघणाऱ्या वैजयंताताई आपले काम जोमाने करायच्या
शाळेची आर्थिक बाजू कमकुवत होती . त्या वेळी शिक्षक ठेवायचा तर पाचशे रपये महिनाभराचा पगार द्यावा लागत . ते पाचशे रुपये वाचवून शाळेला हातभार लागावा यासाठी ताई सकाळ आणि दुपार अश्या दोन्ही सत्रात अश्या दोन्ही सत्रात वर्ग घेत . एव्हडाच नव्हे तर विद्यार्थ्यांचे गणवेश शिवून ,उन्हाळ्यात पुस्तके विकून शाळा उभी करणाऱ्या वैजयंताताई स्वतः मात्र वर्ष-वर्ष एकच साडी वापरत .आपण घरात साखर संपली कि लगेच टेन्शन घेतो .. पण तेव्हा ताईच्या घरात काहीच नसायचं तरीही त्या आनंदी राहून शाळेकडे लक्ष द्यायच्या .बघता बघता एका खोलीतून दुसऱ्या बंगल्यात दुसऱ्या बंगल्यातून तिसऱ्या बंगल्यात हलवली आणि शेवटी शाळेला जागा मिळाली.
हर्सूल टी पाईट येथे प्रतिभाताई पाटील शाळेची तीन मजली ईमारत आहे शाळा दोन सत्रात भरते शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या वैजयंता ताईनी शाळेचे वटवृक्ष केले आहे आजघडीला शाळेत जवळपास ३९ कर्मचारी आहे शाळेत ताई विविध उपक्रम राबवतात .उपक्रमाबद्दल माहिती सांगताना ताई म्हणाल्या “मी विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला लहान वर्गासाठी पेन्सिल आणि मोठ्या विद्यार्थ्यांसाठी पेन म्हणून भेट देते त्यांना चॉकलेट देखील देते . विद्यार्थ्यांना अक्षर ओळख होण्यासाठी , पाढे पाठ होण्यासाठी विविध ,सन उत्सवाची माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम करून घेते . " प्रत्तेक वर्गाला वर्गातील प्रत्तेक तुकड्यांना विविध फळा फुलांचे नाव दिले जातात त्यातून विद्यार्थी नकळत शिकतात . शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचा प्रत्तेक विद्यार्थी पुढे बसतो .पहिला माघे आणि मागचा पुढे ह्या पद्धतीने सगळ्यांना पुढे बसण्याची संधी दिली जाते
वैजयंता ताई यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे . समाजात लोक त्यांना जिद्दी मुख्याध्यापिका म्हणून ओळखतात शेतमजूर ते मुख्याधापिका ह्या प्रवासात अनेक अडचणींना तोंड देणाऱ्या वैजयंता ताई आज एका निवांत क्षणी आहे . त्यांच्या पुढील आयुष्यास हार्दिक शुभेच्छा
.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा